मराठी ब्लॉगिंग संदर्भात मी लिहीलेला लेख आजच्या लोकसत्ता मधे जरुर वाचा आणि आपल्या प्रतिक्रीया द्या. जागेअभावी ह्यांतल्या अजून कितीतरी उत्कृष्ट ब्लॉग्जविषयी मला सविस्तर लिहीता आलेलं नाही. मराठी मेनस्ट्रीम मिडिया अजूनही ब्लॉग्ज ह्या प्रकाराची काहीही दखल घेत नाही ह्याचा खेद वाटतो. ब्लॉगिंग हा नव्या जगाच्या साहित्यप्रकारातच मोडणारा प्रकार आहे आणि तो जास्तीतजास्त वाचकांपर्यंत पोचावा (अगदी इंटरनेट न वापरणार्याही) असं वाटतं. मात्र त्यासाठी नियमीत ब्लॉगर्स जे आहेत त्यांनीही ब्लॉगिंग कडे जास्तं गंभीरपणे पाहून त्यात निरनिराळे प्रयोग करत रहाणं, दर्जा उंचावत रहाणं आवश्यक आहे.
P.S. लेखामधे उल्लेख झालेली इंडीब्लॉगीजची स्पर्धा २००७ सालामधील आहे. लेख वृत्तपत्राकडे गेल्या महीन्यात दिलेला असल्याने तपशिलात ह्या स्पर्धेचा उल्लेख ’ह्यावर्षीचा’ असा केला गेला तो बरोबर नाही. ह्यावर्षीची स्पर्धा अजूनन झालेली नाही.
Saturday, January 19, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
14 comments:
छान लेख लिहीला आहे, आठवणीने नांव ऍड केल्याबद्दल धन्यवाद! :-) मराठी ब्लॉगविश्वास चांगले दिवस यावेत अशा सर्वांनाच शुभेच्छा!
छान लेख आहे. मराठी ब्लॉगांबद्दल आवर्जून लेखन केल्याबद्दल धन्यवाद.
तो आप ही वो शख़्स. आणि मी आपल्यालाच हा लेख वाचायला सांगीतला. धन्य माझी.
धन्यवाद. मराठी ब्लॉगांबद्दल लेख लिहील्या बद्द्द्ल व माझ्या बॉग चा उल्लेख केल्या बद्द्ल.
मराठी ब्लॉगांबद्दल वृत्तपत्रामध्ये लेखन केल्याबद्दल धन्यवाद. संजोप राव, अजित यांचे सुंदर ब्लॉग्जही तिथे यायला हवे होते.
hey thanks shamaa! It was indeed a good write-up!:D.
HK tumhalahi thanks muddam mala hyabaddal sangitalat mhanun.
शमा,
लेख चांगलाच आहे. शेवटी दिलेल्या यादीतील URL मधे मात्रं भरपूर चुका आहेत. त्यामुळे वाचकांना ब्लॉग्ज सापडत नाहीयेत पटकन.
तुमच्या स्वतःच्या ब्लॉगचे नाव शमा-ए मेहफिट असे झाले आहे.
निदान online आवृत्तीमधे तरी ते सुधरवता यावे असे वाटते. मी लोकसत्तेला लिहीले आहे, पण अजुन सुधारणा झालेली दिसत नाही.
धन्यवाद.
श्री व सौ मधे आपला लेख वाचला
आजचाही लोकसता मधील लेख मस्त आहे.
14 तारखेच्या लेखाची लिंक मिळेल का ?
तुमचा ब्लॉग वाचला. ("लोकसत्ता' मधील लेख मात्र वाचलेला नाही.) ब्लॉग ह्या प्रकाराकडे लोकांचे म्हणावे तितके लक्ष गेलेले नाही हे खरेच आहे. आज कित्येकांना ऑफिसात चांगले नेट कनेक्शन असताना ऑफिसच्या वेळात मधूनच महाजालावर मुशाफिरी करणे शक्य आहे. तशी मुशाफिरी लोक करतातही. पण अनेक मराठी मंडळींना संगणकावर बरेचसे मराठी यायला लागले आहे याची जाणीवच नाही.
चकरता वरील लेख फार भावला, रमणीय निसर्गापेक्षा ही देखणा
भुतान वरचा लेख अप्रतीम
nice article in bhatkanit MAy2008
Post a Comment