
पारंपरिक महाराष्ट्रीयन स्त्रीचे दर्शन नथ ह्या दागिन्याशिवाय पुरेच होवू शकत नाही असे मानले जाते. पेशवाई संस्कृतीचा हा अगदी पिढ्यानपिढ्या घरांमधून जपला गेलेला, सणासमारंभात अभिमानाने मिरवण्याचा दागिना. पण नथ हा दागिना महाराष्ट्रात कसा व कुठून आला ते वाचल तर हा अभिमान शिल्लक राहील का?
नथ हा संपूर्ण अभारतीय असणार्या परकी संस्कृतीमधला आणि भारतीयांनी त्याज्य मानावा असा अलंकार. भारतात नाक टोचण्याची परंपरा नाही. रामायण, महाभारत, प्राचीन लेख, वेरुळ अजिंठा येथील चित्रे व शिल्पे यांत कोठेही नाकातील अलंकारांचा निर्देश नाही. ही चाल येथे मुस्लिम धर्मियांनी आणली. त्यांच्या संस्कृतीत स्त्रीची किंमत गुराढोरांएवढीच. उंटाच्या नाकात मध्ये भोक पाडून जी वेसण अडकवली जाते तिला 'बुलाक' असे नाव आहे. तीच बुलाकची संकल्पना दागिन्याच्या रुपात त्यांनी स्त्रीच्या नाकात अडकवली.हळूहळू येथे आलेले मुसलमान राज्यकर्ते झाले. त्यांची साम्राज्ये वाढली आणि येथील हिंदू सरदार सुभेदार त्यांची चाकरी करण्यात धन्यता मानू लागले. त्यांच्या पोषाखाचे अनुकरण करु लागले. त्या वेळी हा बुलाक दागिना येथील हिंदू स्त्रियांच्या नाकातही प्रवेशला.
आज गुजराती, मारवाडी महिला नाकात मध्यभागी लोंबणारे सोन्याचे कडे व त्याला डाव्या आणि उजव्या बाजूंना अडकवून कानापर्यंत नेलेली सोन्याची साखळी असा जो अलंकार धारण करतात, तो म्हणजे दुसरे काहीही नसून ही सोन्याची किंमतवान वेसणच आहे.
महाराष्ट्रात हा दागिना थोडा उशिराच आला ( बहामनी राजवट ) पण येथेही त्याला तीच प्रतिष्ठा लाभली. त्याला प्राकृत भाषेतील 'नथ' हा शब्द वापरला गेला. नथ या देशी शब्दाचा अर्थही 'बैलाच्या नाकातली वेसण' असाच आहे. पेशवेकाळापर्यंत येथेही नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरुप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार रईस लोकांनी या मूळच्या नथीचे रुप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून जे नथीचे नवे स्वरुप तयार केले तेच आता महाराष्ट्रात चालू आहे.
नथ या अलंकाराला कोणतीही भारतीय आणि सन्मान्य परंपरा नही हे सत्य आपणास कधी नाकारता येणार नाही. संस्कृती परंपरा जपण्याच्या नादात आपण कसे कधी कधी चुकीच्या चालीरितींचे जतन करतो इतकेच नव्हे तर पुढल्या पिढ्यांनीही त्या जपाव्यात हा आग्रह अजाणतेपणातून धरतो त्याचे हे रत्नजडीत उदाहरणच म्हणायचे
2 comments:
Good post.. I never new it..
छान लिहितेस तू ......
Post a Comment