Wednesday, October 24, 2007

तरीही शब्दातच..

सगळेच अनुभव शब्दांत व्यक्त करता आलेच पाहिजेत असा हट्ट कां असतो आपला? एकतर बोलून तरी दाखवायचं किंवा लिहून तरी! आपण सारे सतत हेच करत असतो. दुसर्‍यांपर्यंत अनुभव पोचलेच पाहिजेत आपले असा तरी अट्टाहास कां असावा आपला? अनुभव घ्यावा. आत आत खोलवर झिरपू द्यावा. आपल्यातच. पण नाही.
आपण सगळेच किती शब्दांच्या व्यापात हरवून जायला आसुललेले असतो!

कधी कधी शब्द म्हणजे नुसता गोंगाट असतो. प्रत्यक्ष अनुभवापासून ते विचलित करतात. जसं एखादा फोटोग्राफर आठवणी साठवून ठेवण्याच्या अतिउत्साहापायी वर्तमानात जगण्याचे हरवून बसतो.

त्या संदर्भात एक झेन कथा वाचली होती ती आठवली...


एके दिवशी एक तरुण भिक्षू आणि त्याचे गुरु फुजियामा पर्यंत लांब फेरफटका मारायला जात होते. त्या भिक्षूने तो बर्फाळ डोंगर बर्‍याच वेळा पाहिला होता. तरी त्याला प्रथमच तो खर्‍या अर्थाने जाणवला. जाता जाता तो रानफ़ुलांचे रंग, त्यातली एकतानता, पक्ष्यांच्या भरार्‍या, पहाटेचं तेज आणि हिरवा ताजेपणा, पवित्र पांढर्‍या पाईन वृक्षांचे अंकुर याबद्दल उत्साहाने सांगत होता:" कसं सगळं घडवलय! हा दगड कित्ती दगडी आहे! किती सुंदर आहे ना सगळं? बुलबुलचा आवाज किती गोड... ऐकतो आहेस न? किती अद्वितीय आहे!"

काही तरी पुटपुटत, लंगडत वृद्ध गुरु पुढं जात राहिले. सरते शेवटी शिष्याच्या लक्षात गुरुंच दीर्घ मौन आलं. आणि तो तळमळीनं थोड्या मोठ्यांदाच म्हणाला," हे असं नाही कां? हे पर्वत, ह्या नद्या आणि ही भव्य पृथ्वी, हे सर्व अलौकिक नाही कां? हे सुंदर नाही कां?"

गुरु त्याच्याकडे वळून ठामपणे म्हणाले," हो रे!! पण हे असं सारखं म्हणत राहाण्यात काय हाशिल आहे?"

...............टी.एस.इलियट काय वेगळं म्हणाला होता?

शब्द... ताणतात
तडकतात ओझ्याखाली
आणि कधीतरी तुटतात.
तणावाखाली निसटतात,
घसरतात, नष्ट होतात.
अचूकते अभावी कुजतात
एका जागी टिकत नाहीत.
स्थिर राहत नाहीत.

शब्द जर इतकेच पोकळ आणि उथळ असतील तर कशाला हा अट्टहास आपला तरी की सगळे अनुभव शब्दांत मांडताच आले पाहिजेत?

6 comments:

Nandan said...

शब्द जर इतकेच पोकळ आणि उथळ असतील तर कशाला हा अट्टहास आपला तरी की सगळे अनुभव शब्दांत मांडताच आले पाहिजेत?

-- kahi anshi khare aahe. kahi kahi anubhav shabdaateetach asataat. paN ase (shabdaateet) anubhav aahet, he sangayala shabdanchich garaj padate ki shevati :)

'kahi ekant, kahi galbala' asa suneetabainni mhatalyapramaNe aapali manovRutti asate. jevha anubhav gheun kholvar zirpu dyava, ekantaatach to anubhava asa vaaTat asel tevha tasa karava. paN kadhi kadhi aapalyala yeNaare anubhav char lokannahi sangaavet asa vaaTata tevha te jaroor sangaavet. lekh, kavita, blogs, chitre -- saare tyachech bhaag. arthaat, sagaLech anubhav shabdabaddha karaavet aaNi dusaryanparyant pochavavet ha aTTahaas chukeecha aahe he agadi many.

[Just kidding - posts kami lihiNyaamagache samarthan tar nahi na he :)]

Kshipra said...

The best and most beautiful things in the world cannot be seen or even touched - they must be felt with the Heart.

ह्याची आठवण झाली. असावेत असे काही अस्पर्श अनुभव. मला असा अनुभवांचा खाजगीपणा (स्वताचा आणि दुसर्याचा) जपायला आवडतो. व्यक्त होण्यात सहजता असावी असे वाटते. सहजतेमुळे आनंद मिळतो. अनुभव झिरपू द्यावा ह्याच्याशी मी सहमत आहे. पोस्ट आवडले.

Dhananjay said...

Lekh and goshta awadali.

Kiran said...

I really liked ur post, thanks for sharing. Keep writing. I discovered a good site for bloggers check out this www.blogadda.com, you can submit your blog there, you can get more auidence.

Raj said...

सुंदर. झेन गोष्टींप्रमाणेच विचार करायला लावणारा लेख.

HAREKRISHNAJI said...

सुरेख झेन कथा