Sunday, October 02, 2016

“द थिएटर ऑफ़ इब्राहिम अल्काझी”


तीन महिन्यांच्या गॅपनंतर टाऊनमधे चक्कर झाली.
अर्थातच मुंबईतल्या कला-क्षेत्रात काय चालू आहेकाय बघायचं मिस केलं हे जाणून घ्यायची उत्सुकता होती.
आणि अशावेळी एनजिएमए मधे भरलेल्या द थिएटर ऑफ़ इब्राहिम अल्काझी” या प्रदर्शनाद्वारे एक दुर्मिळ रत्नभांडार नजरेसमोर खुले झाले.
थिएटरचित्रकलासिनेमासमाजराजकारणप्रवाससंगीतनृत्य.. कोणाही व्हिज्युअल-फ़ाईन आर्टप्रेमीचे मन समाधानाने ओसंडून वाहू लागेल असे हे मल्टीमिडिया प्रदर्शन.



थिएटर लिजन्ड अल्काझी- हा माणूस शब्दश: एक संस्था आहे.
भारतीय आधुनिक कलायुगाचा उदय आणि अल्काझींची गोष्ट एकत्रच सुरु होते. अल्काझींचा सगळा इतिहासविशेषत: ४०-५० च्या दशकात त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात केलेलं पायाभूत काम१९६२ मधे स्थापन केलेली राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था.. थिएटर बद्दलच्या त्यांच्या क्रांतिकारी कल्पनाविचारत्यांची अत्याधुनिक ट्रेनिंग मेथॉडॉलॉजीदिग्दर्शनअभिनयसेट डिझाईनलायटिंग या प्रत्येक गोष्टीत त्यांनी घातलेला आंतरराष्ट्रीय संकल्पना आणि भारतातील लोककला परंपरा यांचा क्रांतिकारी मेळ.. याची कल्पना हे प्रदर्शन पहाताना येते.

थिएटर वर्कशॉप्सचे व्हिडिओज आणि शेकडोहजारो कृष्णधवलदुर्मिळ देखणी छायाचित्रेवस्तुकागदपत्रस्टेज सेट्सची मॉडेल्सकॉस्च्यूम्स... या सगळ्यातून अल्काझींच्या तालमीत तयार झालेले अनेक कलाकार दिसत रहातात. ओम शिवपुरीमनोहर सिंगसुरेखा सिक्रीउत्तरा बावडेकररोहिणी हत्तंगडीनासिरुद्दीन शाहओम पुरीअनुपम खेरपंकज कपूर.. हिंदी सिनेमाचा पडदा उजळून टाकणारे हे कलाकारबी.व्ही. कारंथनीलम मानसिंगमोहन महारिषीरंजित कपूररतन थिय्यामअमल अल्लानएम.के,रैनासारखे गुणी दिग्दर्शक.. या सर्वांचं उमेदवारीतलं कामत्यांची त्या काळातली इन्टेन्सिटी जाणवत रहाते.
अनेक गमती जमतीही.. ओम शिवपुरी तरुणपणी ऎक्चुअली हॅन्डसम दिसायचा आणि सुधा शिवपुरी देखणी दिसायची. रोहिणी ओक (हत्तंगडी) तशीच दिसायचीनासिरअमरिश पुरीला तरुण पाहिलेलं आठवत असल्याने ते काही फ़ार वेगळे नाही वाटले. खूप मजा येते जे पहाताना.

इंडियन कॉस्च्यूम्स वरची अल्काझींची पुस्तकं,  मराठी नाटकांचा इतिहासभुलाभाई देसाई मेमोरियल संस्थेची इमारत जिचा स्वत:चा एक सांस्कृतिक इतिहास आहे त्यातील दुर्मिळमहत्वाची छायाचित्रेसुलतान अकबर यांचीअल्काझींची स्वत:ची अतिशय सुंदरदुर्मिळ पेंटींग्ज.. ते इतके छान चित्रकार होते ही गोष्टच आजवर माहित नव्हती. अशा असंख्य गोष्टी आहेत प्रदर्शन पहाताना पहिल्यांदाच जाणवतातकळतात.
अनमोल आर्काइव आणि डॉक्यूमेन्टेशन आहे हे प्रदर्शन.


अल्काझी टाइम्स हा तर अफ़लातून प्रकार. आर्ट आणि थिएटर टाईम्स हे एक काल्पनिक वर्तमानपत्र इथे डिझाईन केलं आहे. यातल्या पानांवर व्हिन्टेज आर्काइवचा मनोरम आविष्कार  या कोलाजमधे आहे. नाट्यचित्रकला क्षेत्रापासून आर्किओलोजीलॅन्डस्केप्समिलिटरी स्टडीजभारतीत स्वातंत्र्याची चळवळत्याच काळात उदयास आलेली भारतीय आधुनिक कलेच्या चळवळीतले महत्वाचे टप्पेअगदी चित्रकार धुरंधरांच्या निधनाची वर्तमानपत्रात आलेल्या बातमी पासून केनेडींची हत्यागांधीजींची हत्यात्यांची आधीची उपोषणेसत्याग्रहाच्या बातम्यापाकिस्तानचीनचा हल्ला झाला.. अकबर पदमसींवरच्या केसचे तपशीलजहांगीरची स्थापना,.. अनेक बातम्या वाचायला मिळतात. ४० ते ५० च्या दशकापासूनचा भारतीय उपखंडाचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक इतिहास नजरेसमोर जिवंत होतो.



अल्काझी हे व्हिन्टेज फोटोग्राफ़्सचे एक मोठेखाजगी संग्राहकही होते. १९ आणि २० व्या शतकातल्या भारत आणि दक्षिण आशियातल्या दुर्मिळ कृष्ण-धवल छायाचित्रांचा सर्वात मोठा आणि महत्वाचा संग्रह त्यांनी केला. अल्काझी कलेक्शन ऑफ़ फ़ोटोग्राफ़ी सुप्रसिद्ध आहे. प्रदर्शनात ४० ते ५० च्या दशकातले आणि नंतरच्या काळातले भारतातील महत्वाचे फोटोग्राफ़र्सस्टुडिओ फोटोग्राफ़ीतलं काम मांडले आहे.
फोटोग्राफ़िक आल्बम्ससिंगल प्रिन्ट्सपेपर निगेटीव्जग्लास प्लेट निगेटीव्ज. पेन्टेड फोटोग्राफ़्सइंडियाबर्मासिलोननेपाळअफ़गाणीस्तानाततिबेटमधून जमा केलेली पिक्चर पोस्टकार्ड्स.. अशा अनेक गोष्टींमधून त्यांचं फोटोग्राफ़ीवरचं प्रेमसौंदर्यदृष्टीव्हिज्युअल आर्टच्या संदर्भातला त्यांचा कल्चरलमॉडर्निस्ट ऎटीट्यूड दिसतो.

एखाद्या माणसाच्या अंगातल्या कला कर्तुत्वाला किती मिती असाव्यात याची सगळी परिमाणंसगळी गणितं अल्काझींच्या बाबतीत खोटी ठरावीत. त्यांच्या ५० हून अधिक वर्षांमधे केलेल्या अवाढव्य कामाचे रेट्रोस्पेक्ट्व करणे हे काम सोपे नाही. अमल अल्लाना यांनी क्यूरेट आणि निस्सार अल्लाना यांनी डीझाईन केलेल्या या प्रदर्शनातला अनेक व्हिडिओजलाईट बॉक्सेस आहेतप्रिन्ट्सफोटोग्राफ़्सपेंटींग्ज.. असा सगळा अल्काझींचा क्रिएटीव पसारा पहात असताना मनात येतं या मल्टीमिडियालाही अल्काझींची व्हिजनत्यांची कल्पनाशक्ती कॅप्चर करता आली असेल का?



अल्काझींच्या थिएटरआर्ट आणि फोटोग्राफ़ी क्षेत्रातल्या कामाचे दुर्मिळ रत्नमाणकांनी खचाखच भरलेलं अनमोल भांडार पहाण्याची महान आणि दुर्मिळ संधी एनजिएमएनी १८ ऑक्टोबर २०१६ पर्यंत दिलेली आहे.



No comments: