मित्र मैत्रिणींनो .....
हाय!! .... ब्लॉग चे नाव उर्दूमध्ये असले तरी मी मराठीच आहे आणि मराठीतच लिहिणार आहे. खरतर कुसुमाग्रजांच्या जन्मदिनीच ब्लॉग चा शुभारंभ करण्याच मनात होत. थोडा उशिर झाला. पूर्वी इंग्रजीमधून blogging केल्याने ब्लॉगविश्व तस ओळखीच आहे पण मराठीमधून हा ब्लॉग सुरु करण्या आधी थोडा मराठी ब्लॉगविश्वाचा फेरफटका मारला तेव्हा अगदी आनंदाश्चर्याचा धक्काच बसला. किती छान नोंदी केल्यात मराठीमधे मुलामुलींनी. साहित्य, वैयक्तिक, प्रवास अनुभव, चालू घडामोडी अशा कितीतरी विषयांवर देशविदेशातील पब्लिक लिहितं आहे. संख्या त्यामानाने फार नाही. पण मला वाटत युनिकोड सुविधा नुकतीच लोकांपर्यंत पोचली आहे. हळूहळू वाढेल मराठी ब्लॉगर्स ची संख्या.
माझी ओळख पण ह्या निमित्ताने करुन देते. मी मुंबईची मराठी पत्रकार. तसं व्यवसायाने मराठी इंग्रजी भाषेत कॉपिरायटींग करते पण पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे आणि आवड असल्याने, आणि मनमोकळ लिहिता याव, बंधन नसाव म्हणून स्वतंत्र पत्रकारिता करते. अर्थात Free Lancing . व्यवस्थापन, नातेसंबंध, वागणूक, स्त्रियांचे प्रश्न, सांस्कृतिक, सामाजिक असे माझ्या आवडीचे लेख विषय. ब्लॉग मध्येही त्या अनुषंगाने लिहिण्याचा प्रयत्न करीन. प्रवास आणि संगित हे सुद्धा जिव्हाळ्याचे विषय. पण खुप कमी वेळ त्यासाठी काढता येतो ही खंत कायम मनात असते. विविध इंग्रजी लेख आणि पुस्तके अनुवाद करणे हा पण माझा छंद.
भेटत राहूच. तुम्हा सर्वांची ओळख होऊन ती खुप खुप वाढेल ही खात्री आहे.
इथे नियमीत येण्याइतका सलग वेळ मिळो ही सदिcछा मी माझी मलाच देऊन घेते.
10 comments:
शमा,
मराठी ब्लॉग विश्वात आपले स्वागत आहे. आपल्या मराठी पत्रकार(रा?) या कार्यानुभवामुळे पुढील उत्तमोत्तम लिखाणाची वाट बघत आहे. शुभेच्छा!
- पवन
नमस्कार शमा. तुमचं कार्यक्षेत्र अगदी हेवा वाटण्याइतकं मस्त आहे! तुमची 'नियमित ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ मिळो' ही इच्छा सुफळ संपूर्ण होवो.
pawan aani gayatrishi sahamat. Marathi anudhini-vishwat swagat aani shubhechchha.
शमा, स्वागत आणि शुभेच्छा! तुमचे विचार, अनुभव, कार्य याबद्दल वाचायला खूप आवडेल.
धन्यवाद पवन, गायत्री, नंदन आणि सुमेधा. तुमचे चौघांचेही ब्लॉग्ज मी वाचले आहेत आणि मला ते फ़ार आवडले. नंदन ने साहित्यविश्वाच्या नोंदी खुप छान ठेवल्या आहेत.
शमा,
मराठी ब्लॉग विश्वात आपले स्वागत आहे. तुमचा ब्लॊग तुम्ही तुमच्या अनुभवांनी समृद्ध करालच याची खात्री आहे. पण त्या अनुभवांनी आम्ही पण समृद्ध होऊ अशी आशा वाटते.
शमा,
तुमचे मनपासून स्वागत.
ज्या क्षेत्रात आहात, त्यामुळे वाटते कि आपल्या विविध अनुभवाची प्रचिती
आपल्या लिखाणात पहायला मिळेल.
सोबतच `उर्दु' ची नजाकत ही!!!
नावात काय आहे? नावातच सगळं आहे. शमा-ए-महफ़िल ह्यापेक्षा दुसरे चांगले नाव असूच शकत नाही. ऊर्दूचि नजाकत, मराठीचा नखरा, पत्रकराची बाज नजर, बहुश्रुतपणाचि देणगि, हे सर्व जूळून आलंय त्यात आम्हाला नक्कीच भरपूर फ़ूड फ़ॉर थॉट मिळेल.
हेमंत पाटील - सुरत
भरकटलेला.ब्लोगस्पॉट.
Shama,
Nandan kadun ithla patta milala...tula lihayala satat prerana milo hee sadichha :)
Post a Comment