Sunday, April 16, 2006

वाचत असलेली पुस्तके

माझ्या पुस्तक वाचनात शिस्त नाही. म्हणजे एका वेळी एक पुस्तक वाचून पूर्ण करणे किंवा एका लेखकाची सगळी पुस्तके वाचून संपविणे, पुस्तका मधून आपल्याला काय मिळालं, पुस्तकाचा सारांश, टिपणं वगैरे काढून ठेवणं मला कधी जमलच नाही. खरतर अशी ही शिस्त वाचनाला लावून घेणे अत्यंत चांगली व आवश्यक गोष्ट आहे. त्यासंदर्भात काही लेखन करने, परीक्षण करणे, आपल्या इतर लेखांसाठी संदर्भ म्हणून टिपणांचा वापर करणे ह्या गोष्टी त्यामुळे शक्य तर होतातच पण वाचन सुरळीत चालू असल्याचा एक फ़ील पण येतो.

मला एकतर एकावेळी अनेक पुस्तके वाचायची खोड. म्हणजे समजा मी दुकानातून, प्रदर्शनातून चार पुस्तके आणली तर मी घरी आल्यावर ती एकामागून एक सगळी वाचायला सुरुवात करते. लायब्ररीची पुस्तके सोबतीला असतातच. वाचन वेळ मिळेल तस कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी चालू असतं त्यामुळे मग त्या त्या वेळी हाताला येईल ते, पर्स मधे असेल ते पुस्तक आधीच्या पानावरुन पुढे वाचायला सुरुवात होते. अपवाद असतोही एखाद्या खूपच मनाची पकड घेणार्‍या पुस्तकाचा. पण तसे पुस्तक अपवादानेच हातात पडते हल्ली. रात्रभर जागून हातातले पुस्तकं संपवल्याशिवाय झोपच न येणे असा प्रसंगच खूप कमी येतो.

मॅजेस्टीकच्या ग्रंथयोजनेची मी सभासद आहे. परवा त्या योजनेची वार्षिक मुदत संपली. मग एकदम एकावेळी खूप पुस्तके विकत घ्यायचा सुवर्णयोग आला. अधाशासारखी पुस्तके विकत घेतलीत. आणि आणल्यापासून ह्या पुस्तकाची दोन पाने, त्याची काही प्रकरणे असं चालू केलय. न वाचलेलं पुस्तकं घरात अवतीभवती असणं मनाला त्रासदायक असतं. चैनच पडत नाही. पण ह्यावेळी मात्र मी मनाशी ठरवलय की जमेल तितकं शिस्तीने पुस्तकं वाचायची. त्यांची जमतील तशी परीक्षणं पण लिहायची. त्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग उघडायचा मनात आहे.

सध्या माझ्या अवतीभवती पसरून असलेली पुस्तकं ही आहेत्:

१ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२ ब्र - कविता महाजन
३ मौनराग -महेश एलकुंचवार
४ स्टुडिओ - सुभाष अवचट
५ जगण्यातील काही - अनिल अवचट
६ फुलवा -डॉ. श्रीश क्षिरसागर
७ सिनेमाचे दिवस - विजय पाडळकर
८ कोबाल्ट ब्लू -सचिन कुंडलकर
९ चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
१० रानातल्या वाटा -मारुती चितमपल्ली
११ केशराचा पाऊस -मारुती चितमपल्ली
१२ भूमी -आशा बगे
१३ राजा रविवर्मा - रणजित देसाई
१४ भूप -मोनिका गजेन्द्रगडकर ( ह्या विद्याधर पुंडलिकांच्या कन्या )

तर मित्रांनो .... शक्य तितक्या लवकर संपवते ही पुस्तके आणि लिहीते त्यावर जमेल तस परीक्षण

5 comments:

शैलेश श. खांडेकर said...

तुमच्या लेखावरून काही वर्षांपूर्वी ऐकलेलं एक वाक्य आठवलं - "कित्येकदा पुस्तकं वाचण्यापेक्षा ते वाचायचे बेत रचणे हासुद्धा एक आनंददायी अनुभव असतो." :) अर्थात, तुम्हाला ही पुस्तके प्रत्यक्ष वाचनाचा आनंद मिळो अन आम्हा वाचकांना पुस्तक-परिक्षण वाचण्याचा. असा योग लवकरच येवो या शुभेच्छा अन सदिच्छा.

Nandan said...

कोबाल्ट ब्लू पुस्तकाच्या विषयाबद्दल उत्सुकता आहे. वाचून झाले की नक्की परीक्षण लिहा या साऱ्या पुस्तकांवर.

Nandan said...

Hello Shama, No post for a long time. Hope you will get time to write one soon.

HAREKRISHNAJI said...

कोणे एके काळी मी एक एक लेखक, लेखीका घेत त्यांची सर्व पुस्तके वाचुन काढत होतो.
गेले ते दिन गेले

JalindarKumbhar said...

Mi ek cinema director ahe...marathi madhe cinema vhava ashi kahi chagli pustake tumhala suchtat ka? (vishyache bandhan nahi) pls mala (mr.jalindar@rediffmail.com) var mail kara kivva call me on 9819822632..
thanx