Tuesday, January 10, 2012

'चित्रकारांच्या प्रदेशात..' स्टुडिओ सिरिज

चित्रकार आणि त्याचा स्टुडिओ- या विषयावर आधारीत "चित्रकारांच्या प्रदेशात.." ही ब्लॉग-सिरिज चिन्ह-ब्लॉगवर आजपासून सुरु केली आहे.

चित्रकार शुभा गोखले आणि तिचा स्टुडिओ-'गोंदणगाव' हे दोन्ही अत्यंत वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण. तिच्यापासूनच या मालिकेचा शुभारंभ केला आहे. 'चित्रकारांच्या प्रदेशात..' चे हे इन्ट्रो पोस्ट आणि 'गोंदणगाव' हे आज टाकलेले पोस्ट दोन्ही जरुर जरुर वाचा.

आणि प्रतिक्रियाही नोंदवा. मालिकेतील पुढच्या भागात काय हवेय आणि काय नकोय हे तुमच्या प्रतिक्रियांमधून समजू शकेल याकरता हा आग्रह.