अजमल कसाबला मरेपर्यंत फाशी.
भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो! तुकाराम ओबळेंच्या आत्म्याला आता थोडी स्वस्थता लाभेल.
पण अजमल ही फक्त सापाची शेपटी आहे. दहशतवादाचा आख्खा विषारी अजगर पाकिस्तानात सुस्तावून पडलेला आहे त्याला कधी ठेचणार? मास्टरमाईन्ड मिळेपर्यंत कसाबाच्या फाशीचा पूर्ण आनंद लुटता येणार नाही.
अर्थात तसंही याच भारतीय न्यायसंस्थेने फाशीची शिक्षा सुनावलेले ३८ जण अजून रांगेत आहेत त्यानंतर कसाबचा नंबर लागणार. म्हणजे कधी अजून पंचवीस वर्षांनी कसाबला फासाच्या दोराला लटकलेलं बघता येणार? तोपर्यंत सीएसटी स्टेशनात मारले गेलेल्या त्या सार्या निरपराध आत्म्यांनी काय करायचं? नुसतंच तळमळायच?
तरीही पुन्हा भारतीय न्यायसंस्थेचा विजय असो!
उज्वल निकम आणि जज टहलियानींचे आभार.
No comments:
Post a Comment