'चिन्ह'साठी मी २००५ साली पहिल्यांदा लिहिलं.चित्रकार अतुल दोडियावर काहीतरी होतं ते.त्याच्या स्टुडिओत जाऊन गप्पा-मुलाखत वगैरे.त्यानंतरची चार वर्षे खूप वेगवेगळ्या चित्रकारांवर चिन्हसाठी लिहिलं.कला आणि जाणीवांच्या संदर्भात प्रत्येकवेळी जास्त जास्त समृद्ध होत गेले.गेल्या वर्षी लिहिलेल्या'राजा रविवर्मा आणि त्याने चितारलेल्या त्या सगळ्या देखण्या,दैवी चेहर्यांमागचा चेहरा शोधण्याच्या अनुभवांवरचा,रविवर्माच्या मळवलीच्या आता तर पूर्ण जमिनदोस्त झालेल्या पण शतकभरापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणार्या रविवर्मा प्रेसच्या दुर्दशेवरचा लेख मात्र खर्या अर्थाने अंतर्मुख करुन गेला.खूप काही देऊन गेला आणि घेउनही गेला.त्या अनुभवांवरही बरंच काही लिहिण्यासारखे आहे..'चिन्ह'वरच खरं तर इतकं काही लिहिण्यासारखं आहे!
'राजा रविवर्मा-एक शोधयात्रा'साठी दोन वर्षे जीवापाड मेहनत केली होती.विनायक परबने'चिन्ह'वार्षिकातल्या माझ्या या लेखावर भरभरुन लेख लिहिला तेव्हा केलेल्या मेहनतीची दखल आणि कलाक्षेत्रातल्या अचूक डॉक्युमेन्टेशनचे महत्व अजून कुणालातरी पटतय याची जाणीव मनाला खूप उमेद देऊन गेली.

1 comment:
ग्रेट ग्रेट... सहीच !!!! मनःपूर्वक अभिनंदन !!!!
Post a Comment