अरे निदान संदर्भ देण्याचं तरी सौजन्य बाळगा.
आत्तापर्यंत मला आपल्या कॉलम/लेख/ब्लॉगपोस्ट्सची मराठीतल्या मराठीत झालेली चोरी पहायची सवय होती. पण आता इंग्रजी वृत्तपत्रेही सरळ सरळ (आणि शब्दशः) डल्ला मारायला लागलीत.
दै.लोकमतकरता मी लिहित असलेल्या 'चित्रभाषा' कॉलमचे एक वाचकचाहते श्री. रवी वेलणकर यांनी आजच सकाळी कुरिअरने 'डेक्कन हेराल्ड' च्या बंगलोर आवृत्तीमधले (२७ मे.१२) एक कात्रण मला पाठवले. 'द स्क्रीम' या माझ्या कॉलमचे (१३ मे.१२) शब्दश: भाषांतर कोणा गिरिधर खासनिसांनी संडे हेराल्ड- आर्ट अॅन्ड कल्चर करता केले आहे. काही फुटकळ वाक्य तेव्हढी स्वत्;ची घातली लांबी वाढवायला. केवळ धन्य प्रकार आहे हा.
'उचलेगिरी' इतक्यांदा झालीय की आता खरं तर त्याबद्दल काही आश्चर्य/राग इत्यादी वाटायचाही कंटाळा यायला हवाय. पण तरीही जे वाटतं ते उद्वीग्नतेच्या पलीकडचं असतं.
4 comments:
kaThiiN!
भयानक आहे सगळे हे
भयानक आहे सगळे हे
कहर आहे !! तुम्ही तक्रार करा ताबडतोब..
Post a Comment